Ad will apear here
Next
‘महाबँके’कडून व्याजदराचे सुसूत्रीकरण
पुणे : बँकेने विविध कालावधीतील कर्जाच्या व्याजदरामध्ये (एमसीएलआर) सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने व्याजदर बदलले आहेत. नवीन व्याजदर सात मे २०१८पासून लागू करण्यात येणार आहेत.

कर्जाचा कालावधी आणि कंसात व्याजदर (एमसीएलआर) असा : एक दिवस (८.३० टक्के), एक महिना (८.३५ टक्के), तीन महिने (८.४५ टक्के), सहा महिने (८.५५ टक्के) आणि एक वर्ष (८.७५ टक्के).  बँकेने किरकोळ मुदत ठेवीवरील (एक कोटींपर्यंत) व्याजदर वाढविले आहेत. एक ते दोन वर्ष कालावधीच्या किरकोळ मुदत ठेवीवर (1 कोटींपर्यंत) व्याजदर आता ६.५० टक्के झाला आहे, तर दोन ते तीन वर्षे कालावधीच्या किरकोळ मुदत ठेवीवर (एक कोटींपर्यंत) व्याजदर आता ६.६० टक्के मिळेल. हा व्याजदर आधी ६.२५ टक्के होता.

बेस रेटमध्ये (आधार दर) कोणताही बदल झाला नसून तो पूर्वीप्रमाणेच ९.५० टक्के (वार्षिक) इतका कायम ठेवण्यात आलेला आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZVRBO
Similar Posts
‘महाबँके’ची ‘माइंड सोल्यूशन्स’सोबत भागीदारी पुणे : ‘ए. टीआरईडीएस’ प्लॅटफॉर्मवर सहभागी होण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने माइंड सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत भागीदारी केली आहे. ‘ए. टीआरईडीएस’ हे लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) त्यांच्या लिलाव प्राप्त झालेल्या तंत्रज्ञानाद्वारे प्रतिस्पर्धात्मक दराने वित्तपुरवठा करण्यासाठी एक डिजिटल
ईएमव्ही चिपबेस एटीएम कार्ड घेण्याचे ‘महाबँके’चे आवाहन पुणे : बँक ग्राहकांचे जुने मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड, नव्या ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाने बदलून देण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे ३१ डिसेंबर २०१८पूर्वी जुनी मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कार्ड नवे ईएमव्ही
‘महाबँके’च्या ८४व्या स्थापनादिनी ७५ कॅश रिसायकलर्स सुरू पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्रच्या ८४ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ७५ कॅश रिसायकलर्स सुरू करून एटीएम सुविधेस नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. आगामी काळात बँक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नफा मिळवण्याकडे वाटचाल करेल,’ असा विश्‍वास बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. एम. व्ही. पटवर्धन यांनी व्यक्त केला
‘ईएसपीएस’ला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे कर्मचाऱ्यांसाठी शेअर खरेदी योजना (ईएसपीएस) जारी करण्यात आली होती. बँकेने या योजनेअंतर्गत त्यांच्या कर्मचाऱ्यांना १० कोटी इक्विटी समभागांची ऑफर दिली होती. ‘ईएसपीएस इश्यु’ला कर्मचाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि पूर्णपणे सब्सक्राइब झाला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language